एअरटेलने लॉंच केले ८ रूपये ते ३९९ रूपयांपर्यंतचे नवे प्लान


नवी दिल्ली : एअरटेलनेही रिलायन्स जिओने मार्केटमध्ये उभे केलेले आव्हान परतवून लावण्यासाठी कंबर कसत नवे प्लान लॉंच केले आहेत. कॉल रेट कटर, टॉकटाईम आणि डेटा प्लान्स अशा ऑफर्सचा या प्लानमध्ये समावेश आहे. सध्या टेलिकॉम क्षेत्रात ऑपरेटर कंपन्यांकडून जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या कंपन्यांमध्ये त्याचा परिणाम म्हणून थेट ऑफर वॉर सुरू झाले आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.

एअरटेलने लॉंन्च केलेल्या प्लानपैकी सर्वात छोटा प्लान केवळ ८ रूपयांचा आहे. तर, ३९९चा प्लान हा सर्वात महाग प्लान आहे. मात्र, या प्लानचा लाभ घ्यायचा असेल तर, तुमचे कार्ड पोस्टपेड असता कामा नये. याचाच अर्थ असा की, हे सर्व प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. ८ रूपयांच्या छोट्या प्लानमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच, सर्व लोकल आणि एसटीडी कॉल ३० पैसे प्रतिमिनीट दराने मिळतो. ४० रूपयांच्या प्लानमध्ये ३५ रूपयांचा टॉकटाईम दिला जातो. जो अनलिमिटेड काळासाठी वैध आहे. ६० रूपयांतही अनलिमिटेड काळासाठी प्लान उपलब्ध आहे. मात्र, या प्लानला ५८ रूपये इतका टॉकटाईम मिळतो.

एअरटेलचा इंटरनेट डेटा प्लानही स्वस्तात उपलब्ध झाला आहे. एअरटेल अवघ्या ५ रूपयांमध्ये ४जीबी डेटा देत आहे. त्याची वैधता ७ दिवस आहे. या ऑफर्सचे वैशिष्ट्य असे की, कोणत्याही युजरला ही ऑफर केवळ एकदाच वापरता येईल. तसेच, ही ऑफर आपल्या जुन्या ३जी सिम कार्डला ४जीमध्ये अपग्रेड करताना मिळेल.

कॅशबॅक ऑफरही एअरटेलने लॉंच केली आहे. तुम्हाला एअरटेल पेमेंट बॅंक अकाऊंट ओपन केल्यावर ३४९ रूपयांच्या रिचार्जवर १० टक्के कॅशबॅक मिळू शकतो. १९९ रूपयांच्या प्लानवरही अनलिमिटेड एसटीडी कॉल सुविधा दिली जात आहे. याशिवाय २८ दिवसांसाठी १जीबी डेटाही मिळत आहे.
दरम्यान, ३९९ रूपयांच्या रिचार्जमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसोबतच प्रतिदिन १जीबी ४जी डेटा मिळणार आहे. या शिवाय ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल सुविधाही मिळणार आहे. हा प्लान घेण्यासाठी अट अशी की, ग्राहकांनी कस्टमर केअरला फोन करून पहिल्यांदा विचारून घ्यावे की, ही ऑफर तुमच्या नंबरला लागू आहे किंवा नाही. १४९ रूपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड एअरटेल टू एअरटेल कॉंलींग सोबतच 2GB 4जी डेटा मिळत आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.

Leave a Comment