अब्जाधीशांची पहिली पसंती आहेत ही पाच हेलिकॉप्टर


अब्जाधीश उद्योगपतींकडे नेहमी एका गोष्टीची कमतरता असते व ती म्हणजे वेळ. त्यांना रोजच्या दिवसांतला एक क्षणही फुकट घालवून चालत नाही. तसेच कामानिमित्त प्रवासही ते टाळू शकत नाहीत. परिणामी प्रवासात जाणारा वेळ कसा कमी करता येईल व त्याचाही सदुपयोग कसा करता येईल याचा प्रयत्न या लोकांकडून नेहमीच केला जातो. त्यामुळे टॉप क्लास बिझिनेसमन प्रवासासाठी सुटसुटीत हेलिकॉप्टरचा वापर करण्यास पसंती देतात. ही हेलिकॉप्टरही कोट्यावधी रूपये किमतीची असतात. त्यातही त्यांची पसंती प्रथम कशाला असते याची ही माहिती


एअरबस एच २५५- युरोकॉप्टर ईसी २२५ सुपरप्युमा असे या हेलिकॉप्टरचे दुसरे नांव आहे. या हेलिकॉप्टरमध्ये जास्त जागा आहे त्यामुळे बिझिनेसमन प्रवासादरम्यान यात बसून बैठकाही घेऊ शकतात. ताशी २७५ किलो मीटर वेगाने जाणार्‍या या हेलिकॉप्टरची किंमत आहे १९० कोटी रूपये.


एडब्ल्यू १०१ व्हीव्हीआयपी हे अगस्ता वेस्टलँड कंपनीचे हेलिकॉप्टर अब्जाधीश उद्येागपतींचे विशेष आवडते आहे. त्याची किंमत १३० कोटी रूपये असून ते जगातील दोन नंबरचे महाग हेलिकॉप्टर आहे. याचा वापर विविध देशांच्या लष्करातही केला जात आहे. याची बंाधणी प्रायव्हेट जेट प्रमाणे केली गेली आहे व आतूनही ते अतिशय सुंदर आहे.


सिकोरस्की एस ९२ हे ११५ कोटी रूपयांचे हेलिकॉप्टर असून यात १५ पेक्षा अधिक लोक एकाचवेळी आरामात प्रवास करू शकतात. यामुळे उद्योगपतींमध्ये हे पॉप्युलर आहे.


बेल ५२५ रलेंटलेस हे हेलिकॉप्टर जगभरातील ५०० हून अधिक अब्जाधीशांकडे आहे. यातूनही १५ लोक प्रवास करू शकतात याची किंमत आहे १०० कोटी रूपये.


एअरबस एच १५५ – युरोकॉप्टर ईसी १५५ असेही याचे नांव आहे. याची किंमत ६० ते ७० कोटी रूपये असून यातून एकावेळी १० प्रवासी आरामात प्रवास करू शकतात.

Leave a Comment