
फेसबुक युजर्सची संख्या दररोज नवनवे विक्रम नोंदवित आहे. युजरसाठी फेसबुकने नको असलेल्या व्यक्तीचे अकौट ब्लॉक करण्याची सुविधा दिली आहेच मात्र युजर तरीही दोन अकौंट ब्लॉक करू शकणार नाही अशी व्यवस्था फेसबुकने केली आहे. ही अकौंट आहेत खुद्द संस्थापक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला यांची
मार्क आणि प्रिसिलाला कुणीच करू शकणार नाही ब्लॉक
मार्क त्याच्या वैयक्तीक फेसबुक पेजवर सतत काही ना काही पोस्ट टाकत असतो. त्यात त्याचे कार्यक्रम, त्याच्या आयुष्यातील घटना, वैयक्तीक माहिती असा अनेक प्रकारचा मजकूर असतो. फेसबुक युजरला जर कोणाची पोस्ट पाहायची नसेल तर अनफ्रेंड करणे, फॉलो करायचे बंद करणे किंवा अकौंट ब्लॉक करणे अशा सुविधा मिळतात. मार्कचे अकौंट यापूर्वी अनेकदा फेसबुक युजरनी ब्लॉक केले आहे. मात्र त्याचे व त्याच्या पत्नीचे अकौंट युंजरला ब्लॉक करता येऊ नये यासाठी फेसबुकने हे नवे पाऊल उचलले आहे. यामुळे या दोघांच्या प्रोफाईलवर युजरने ब्लॉक बटण दाबले तरी एरर संदेश येतो व दुसर्यांदा प्रयत्न करा अशी सूचना मिळते आहे.
