१५ हजार किलो सोन्यातून बनलेय हे लक्ष्मीनारायण मंदिर


दक्षिण भारतात मुळातच मंदिरांची संख्या कमी नाही. येथील गोपुर शैलीची भव्य मंदिरे जगातील पर्यटकांचे आकर्षण आहेत. चेन्नईपासून १४५ किमीवर असलेल्या ऐतिहासिक वेल्लोर शहरापासून ७ किमीवर थिरूमलाई कोडी येथे संपूर्ण सोन्याचे लक्ष्मीनारायण मंदिर उभारले गेले असून त्यासाठी १५ हजार किलो सोने वापरले गेले आहे. सात वर्षे या मंदिराचे बांधकाम केले जात होते. व यासाठी ३०० कोटी रूपयांहून अधिक खर्च आला आहे.

१०० एकर जमिनीवर या मंदिराचा पसारा आहे. शुद्ध सोन्याचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर जगात आजपर्यंत कुठेच केला गेलेला नाही. मंदिराच्या समोरच २७ फूट उंचीची दीपमाळ असून रात्री ही दीपमाळ उजळवली जाते तेव्हा त्या दिव्यांच्या प्रकाशात हे मंदिर असे कांही दिसते की स्वर्गलोकी आल्याचा भास व्हावा. या दिव्यात सोन्याची चमक डोळे दिपवून टाकते. ही दीपमाळ हेही भाविकांचे श्रद्धास्थान बनली असून लक्ष्मीनारायणाच्या दर्शनांनंतर भाविक या दीपमाळेचेही अवश्य दर्शन घेतात.

Leave a Comment