सर्वसामान्यांना आणखी तीन महिने पाहावी लागणार २०० रूपयांच्या नोटांची वाट


नवी दिल्ली – यंदाच्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेली २०० रुपयांची नोट नागरिकांच्या हातात प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बराचे काही महिने वाट पाहावी लागेल असे सध्यातरी चित्र आहे. कारण या नोटेसाठी सध्या वापरात असलेल्या एटीएम मशिन्समध्ये काही बदल करावे लागणार आहेत. हे बदल केल्यानंतरच २०० रूपयांच्या नोटा एटीएममध्ये जमा करता येतील. त्यानंतर त्या सर्वसामन्यांच्या हाती पडतील.

अनेक बँकांनी आपापल्या एटीएम मशिन्समध्ये आवश्यक बदल करण्याचे काम सध्या हाती घेतले असून सध्या २०० रूपयांच्या नव्या नोटेचे परीक्षण यासाठी सुरू आहे. पण या नोटा पुरेशा प्रमाणात अद्याप बँकापर्यंतही न पोहोचल्यामुळे या कामात अडथळे येत आहेत. यापूर्वी नोटाबंदीनंतर जेव्हा ५०० आणि २००० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या होत्या, तेव्हाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांच्यादृष्टीने एटीएम मशिन्स अनुकूल बनवण्यासाठी बराच कालावधी लागला होता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Leave a Comment