२ हजारांनी स्वस्त झाला मोटो जी५ प्लस


मुंबई: मोटो जी५एस प्लस लाँच करतानाच मोबाईल उत्पादक कंपनी लेनोव्हाने आपल्या मोटो जी५ प्लसच्या किमतीत कपात केली असून हा स्मार्टफोन आता बाजारात नव्या किमतीसह उपलब्ध झाला आहे. मोटो जी५ प्लसची किंमत लाँचिंगवेळी १६ हजार ९९९ रुपये होती. कंपनीने त्यामध्ये आता तब्बल दोन हजार रुपयांची कपात केल्यामुळे हा फोन आता १४ हजार ९९९ रुपयाला उपलब्ध असेल.

मोटो जी५एसमध्ये ५.५ इंचाची स्क्रीन, १०८०×१९२० रिझोल्यूशन, ६२५ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, हा फोन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असून ३ जीबी रॅम + ३२ जीबी मेमरी आणि ४जीबी रॅम + ६४जीबी मेमरी असे हे दोन व्हेरीएंट आहेत. अँड्रॉईड नॉगट ७.१ ऑपरेटिंग सिस्टम आणि १३ मेगापिक्सलचा रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्लॅशसह फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment