दिवाळीत येणार रामदेवबाबांचे दिव्य जल


योगगुरूबरोबरच मार्केटगुरू अशी प्रसिद्धी मिळविलेल्या रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेद तर्फे दिवाळीच्या सुमारास बाजारात दिव्य जल हे बाटलीबंद पाणी सादर केले जात आहे. पतंजलीच्या या नव्या उत्पादनातून वर्षाला १ हजार कोटींचा व्यवसाय करण्याचे ध्येय ठरविले गेले आहे. रामदेवबाबा हे पाणी थेट हिमालयातून आणून ग्राहकांना पाजणार आहेत. दिवाळीत हे बाटलीबंद पाणी प्रथम उत्तर भारतात लाँच केले जाईल व नंतर संपूर्ण देशभर ते उपलब्ध होईल असे समजते.

या पाण्याच्या बाटल्यांचे पॅकींग हरिद्वार व लखनौ येथील प्रकल्पात केले जाणार आहे. लखनौ प्रकल्पाची क्षमता दिवसाला १ लाख बाटल्या पॅक करण्याची आहे. सध्या भारतात बाटलीबंद पाण्याच्या क्षेत्रात तगडी स्पर्धा आहे व सध्या या क्षेत्रात बिसलेरी लिडर आहे. या बाजारात बिसलेरीचा वाटा २४ टक्के आहे.

Leave a Comment