झुकेरबर्ग दुसऱ्यांदा बनला पिता


मुंबई : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग दुसऱ्यांदा एका मुलीचा पिता बनला असून फेसबुकवर त्याबाबतची घोषणा झुकेरबर्गने केली. आपल्या पोस्टसोबत त्याने फॅमिली फोटो शेअर करुन, ही बातमी चाहत्यांना दिली. या फोटोत स्वत: झुकेरबर्ग, पत्नी प्रिसिला चैन आणि दोन्ही मुली दिसतात.मुलीचा जन्म या महिन्याच्या सुरुवातीला झाल्याने, तिचे नाव झुकेरबर्ग आणि प्रिसिलाने ‘ऑगस्ट’ ठेवले आहे. लाडक्या ‘ऑगस्ट’साठी झुकेरबर्गने एक खुले पत्रही लिहिले आहे.

झुकेरबर्ग आपल्या पत्रात म्हणतो, डियर ऑगस्ट, या जगात तुझे स्वागत आहे. भविष्यात तू काय बनशील, याची उत्सुकता मला आणि तुझ्या आईला आतापासूनच लागली आहे. तुझ्या बहिणीचा जन्म ज्यावेळी झाला होता, आम्ही त्यावेळीही असेच पत्र जगाबद्दल लिहिले होते. उत्तम शिक्षण, उत्तम जीवन, कमीत कमी आजार, चांगला समाज आणि समानतेच्या जगात तुम्ही मोठ्या व्हा. आम्ही असे देखील लिहिले होते की, तुमची पीढी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आमच्यापेक्षा सरस असेल आणि ते करण्यासाठी आमची तशी जबाबदारी असेल. आम्ही तुमची पीढी आणि भविष्याबाबत प्रचंड आशावादी आहोत.

तापसी पन्नूने आपल्या चित्रपट पिंक ते जुडवा२ चा दरम्यान झालेल्या परिवर्तनाबद्दल केली चर्चा

Leave a Comment