आता जपानी रोबोट करणार अंत्यसंस्कार !


मुंबई : नुकताच एका जपानी कंपनीने माणसावर अंत्यसंस्कार करणारा रोबोट तयार केला आहे. जपानमध्ये बुद्धीस्ट पद्धतीने अंत्यसंस्कार करणाऱ्या धर्मगुरुंना पिपर म्हणून ओळखले जाते. हा रोबोट त्यांचे काम करु शकेल असा कंपनीचा दावा आहे. हा रोबोट कम्प्युटराईज पद्धतीने मंत्रपठण करणे आणि ड्रम वाजविण्याचे काम करु शकणार आहे. नुकत्याच टोकियोमध्ये झालेल्या एका प्रदर्शनामध्ये हा रोबोट पाहण्यास मिळाला.

या रोबोटमधील तंत्रज्ञान सॉफ्टबॅंक ग्रुप कॉर्पोरेशनतर्फे २०१४ मध्ये तयार करण्यात आले होते. जपानमधील अनेक धर्मगुरुंना त्यांच्या समाजाकडून योग्य पद्धतीने अर्थिक साहाय्य करण्यात येत नाही. त्यामुळे अनेकजण त्यांच्या देवस्थानाबाहेर काम करतात. हे धर्मगुरु ज्यावेळी उपलब्ध होणार नाहीत. तेव्हा या रोबोटचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो.

एका अंत्यविधीसाठी धर्मगुरु १ लाख ४० हजार रुपये घेतात. तर या रोबोची किंमत जवळपास ३० हजार आहे. पण व्यक्तीला हृदय असून तो कोणतीही क्रिया हृदयातून करतो. त्याप्रमाणे रोबोला हृदय आहे का हे पाहण्यासाठी मी या प्रदर्शनाला आलो आहे असे जपानी धर्मगुरु तेत्सुगी मात्सुओ यांनी सांगितले. कोणताही धर्माचा योग्य पाया तयार करण्यासाठी हृदयाची आवश्यकता असते. आतापर्यंत या रोबोच्या साह्याने एकही अंत्यविधी करण्यात आला नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment