कधी मिळेल प्री बुक केलेला जिओचा फोन?


नवी दिल्ली : सर्वचजण रिलायन्स जिओच्या 4G VoLTE फिचर फोनची आतुरतेने वाट पाहत होते. या फोनची अनेकांनी प्री-बुकींग केली. पण प्री-बुकींग काहींना करता आली नाही. तुम्हाला सुद्धा बुकींग करता आलेली नाही तर मग तुम्हाला आता आणखीन काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण, रिलायन्स जिओने जिओफोनची बुकींग काही काळासाठी बंद केली आहे.

पण तुम्ही जर जिओचा फोन बूक केला असेल तर तो तुम्हाला कधी मिळेल याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये माय जिओ अॅप इन्सटॉल करावा लागेल. तुम्ही त्यावरुन मोबाईलचे स्टेटस ट्रॅक करु शकता. माय जिओ अॅप इन्स्टॉल केल्यानंतर Manage booking वर क्लिक करा. तुम्ही आता तेथे फोन प्री बुकिंगचा नंबर टाका. त्यानंतर तुमचा फोन ट्रॅक होईल. सोबतच तुम्ही 18008908900 वर कॉल करुन देखील त्याची माहिती घेऊ शकता.

बॉलीवूडच्या हॉट मॉडेलने THE SAVVY EXCELLENCE AWARDSमध्ये दाखविले आपले मादक जलवे

Leave a Comment