जिओला धक्का देणार बीएसएनएल


मुंबई : रिलायन्स जिओने पदार्पणामुळे टेलिकॉम क्षेत्रातील इतर मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. मग या कंपन्यांनी रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी कंबर कसली. ऑफर्सचा ग्राहकांवर पाऊस पडला. आता बीएसएनएल ही सरकारी संस्थाही या खासगी कंपन्यांच्या जोडीला उतरली आहे. एक नवी ऑफर बीएसएनएलने लॉंच केली आहे.

५६ दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट डेटा आणि व्हाईस कॉल सुविधा बीएसएनएलने लॉंच केलेल्या ऑफरमध्ये देण्यात आली आहे. या ऑफरचे एफआरसी असे नाव आहे. ग्राहक यात कोणत्याही नेटवर्कला अनलिमीटेड लोकल आणि एसटीडी कॉल करू शकतात. तसेच, या ऑफरमध्ये ग्राहकाला प्रतिदिन १जीबी हायस्पीड इंटरनेटही मिळणार आहे. हा हायस्पीड डेटा वापरून संपल्यावर तुमचे इंटरनेट तर सुरू राहील. पण त्याचा स्पीड कमी राहील.

IIFA मध्ये कंगना राणावतबद्दल दिलेल्या टिप्पणी बद्दल वरून धवनने मागितली जाहीर रित्या माफी

Leave a Comment