उच्छादी डासांविषयी बरेच कांही


डासांचा उपद्रव हा जगातल्या कुठल्याच देशातील लोकांना नवा नाही. हा छोटासा धड प्राणीही नव्हे व पक्षीही नव्हे असा कीटक माणसासाठी सर्वात धोकादायक बनला आहे. माणसासाठी सर्वाधिक प्राणघातक ठरलेला हा कीटक दरवर्षी जगभरात लाखो लोकांचे जीव घेतो आहे. डास साठलेल्या पाण्यात अंडी घालतात, ते माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही चावतात, त्यांचे रक्त पितात आणि अनेक रोगांचा प्रसार करतात हे ज्ञान आपल्याला सर्वसाधारणपणे असतेच. पण यापेक्षाही बरेच कांही आपण येथे जाणून घेणार आहोत.

आकडेवारी सांगते, जगात दरवर्षी १० लाख मृत्यू डास चावल्यांमुळे होणार्‍या विविध रोगांमुळे होतात. जगात ८ अब्ज माणसे आहेत तर डासांची संख्या आहे साधारण ३०० अब्ज. ही संख्या इतकी मोठी आहे की जर एखाद्या फुटबॉल मैदानावर डासांचा ढीग रचला तर ४ किमी उंचीचा ढीग बनू शकेल. आजपर्यंत या डासांनी कोट्यावधी लोकांना यमसदनी पाठविले आहे इतकेच काय नदीकाठांवर विकसित झालेल्या अनेक प्राचीन संस्कृतींचा नाश डास चावून तेथील नागरिकांना झालेल्या आजारांमुळे झाला असल्याचे सांगितले जाते.


जगात ३४०० प्रकारचे डास अस्तित्वात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नर डास कधीच माणसांचा चावत नाहीत व त्यांचे रक्त पित नाहीत तर चावण्याचे व रक्त शोषणाचे काम मादी डास करतात. या माद्या त्यांच्या वजनाच्या तिप्पट रक्त पितात. मादीला रक्ताची गरज तिच्या अंड्यांचे पोषण करण्यासाठी असते. या अंड्यांच्या पोषणासाठी प्रोटीनची गरज असते ती रक्ततून पूर्ण होते. मात्र डास मादी एकदा रक्त प्यायली की दोन दिवस आराम करते.


नर डास झाडचे रस पिवून त्यांची भूक भागवितात. कांही डास सरपटणार्‍या प्राण्यांचे रक्त पितात तर कांही बेडकांचे. डास तासाला १ ते दीड किमी वेगाने उडतो. डासाची जी गुणगुण ऐकू येते तो त्याच्या तोंडाचा आवाज नसतो तर त्याच्या पंखांचा आवाज असतो. डास एका सेकंदात ३०० ते ६०० वेळा पंख फडफडवतो. डास अंधारात माणसांना शोधतात. आपल्या श्वासावरून ते आपला वेध घेतात. श्यसनातून बाहेर पडणारा कार्बन डास ऑक्साईड व आपल्या शरीराचा गंध, शरीराची उब यावरून ते आपल्याला शोधतात. नर डासाचे आयुष्य सहा दिवसांचे असते तर मादी डास ६ ते ८ आठवडे जगतात. मादी एकावेळी ३०० अंडी घातले. या अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या १० दिवस पाण्यातच राहतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात वर्षाला ३० ते ५० कोटी रोग मलेरियामुळे मरतात. याशिवाय डेंग्यू, यलो फिव्हर, हत्ती रोग यासारखे घातक रोगही डासांमुळेच होतात.

Leave a Comment