महानायकाच्या हस्ते लालबागच्या राजाची आरती


काल संध्याकाळी लालबागच्या राजाचे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दर्शन घेतले. लालबागच्या राजाच्या आरतीच्या वेळी अमिताभ बच्चन उपस्थित होते. त्यांच्यासोबत यावेळी अभिषेक बच्चनदेखील उपस्थित होता. दरवर्षी लालबागच्या दर्शनासाठी अमिताभ बच्चन येतात. महानायक अमिताभ बच्चन यांनी त्याचप्रमाणे यंदाही लालबाबच्या राजाचे दर्शन घेत बाप्पाचा आशीर्वाद घेतला. अमिताभ यांच्या हस्ते बाप्पाची आरतीदेखील करण्यात आली.

अमिताभ यांच्या प्रमाणेच बॉलीवूडमधील इतरही अनेक कलाकार दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. शिल्पा शेट्टी, मनिष पॉल, विवेक ओबेरॉय, संजय दत्त, ऋषी कपूर यांच्यासह इतरही अनेक कलाकार लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून येतात. यामध्ये राजकीय नेत्यांचादेखील समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय अमित शहा यांनी काल दुपारी लालबागच्या राजाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला.

(छायाचित्रे-सचिन हळदे)

Leave a Comment