राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पण, सध्या सोशल मीडियावर बाप्पाची पूजा करण्याच्या मुद्द्यावरुनही आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अभिनेता साहिल खान याने देखील आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. आपल्या घरातील गणेश उत्सवाचा एक फोटोही त्याने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला.
ट्रोल करणाऱ्यांना साहिल खानचे प्रतिउत्तर; गणपतीची पूजा मी करणारच
त्याने शेअर केलेल्या या फोटोला अनेकांनी लाइक केले. पण काही धर्मांध मुस्लिम फॉलोअर्सच्या पचनी त्याचा हा फोटो न पडल्यामुळे त्यांनी साहिलची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. साहिलनेही आपली अशाप्रकारे खिल्ली उडवली जात असल्याचे पाहून या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. साहिलने याबाबत पोस्ट शेअर करत सर्वप्रथम मी एक भारतीय असून, त्यानंतर मुस्लिम असल्याचे साहिलने म्हटले आहे. तुम्हाला खरी ओळख ज्या देशाने मिळवून दिली, प्रसिद्धी दिली, प्रेम दिले त्याचा आदर करायला शिका. तुमची इच्छा असेल तर खुशाल इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन नशिब आजमावा. तुमच्या द्वेषाच्या भावना आणि नकारात्मकतांचा माझ्यासोबत खेळ करु नका. मला सोशल मीडियावर फॉलो करु नका कारण, तुमच्यासारख्या लोकांची मला काहीच गरज नसल्याचेही त्याने म्हटले आहे.