विवोचा Y69 स्मार्टफोन भारतात लाँच


नवी दिल्ली – विवोने भारतात आपला नवा मूनलाईट सेल्फी कॅमेरा फोन Y69 लाँच झाला असून १४ हजार ९९० रुपये ऐवढी या फोनची किंमत ठेवण्यात आली असून १ सप्टेंबरपासून हा फोन अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन तुम्ही ऑफलाईन देखील खरेदी करू शकाल.

या फोनमध्ये अँड्रॉईड ७.० नॉगट ऑपरेटींग सिस्टमसह १.५ GHz ऑक्टा कोअर मीडियाटेक प्रोसेसर आहे. तर ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी असणार आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा फ्रंट तर १३ मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ३००० mAh क्षमतेची बॅटरी बॅटरी आहे. या फोनची किंमत V ५ प्लस पेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment