
पुणे – सुमारे २१ हजार महिला पुण्याचा अधिपती दगडूशेठ गणपतीच्या जयघोषात सहभागी होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेले.
२१ हजार महिलांचे दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण
यंदाही दरवर्षीप्रमाणे अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शंख निनादाने करण्यात आली. गेली २९ वर्षचालू असलेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे यंदा ३०वे वर्ष असून ट्रस्टच्या वतीने प्रत्येक महिलेला उपरण, बॅच तसेच प्रसाद देण्यात आला. संपुर्ण वातावरण सुमारे २१ हजार महिलांच्या उपस्थितीत आणि गणेशाच्या जय घोषात भक्तिमय झाले होते. जय गणेश, जय गणेशच्या घोषणा देत महिला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत होत्या.
कार्यक्रमाचे मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच संयोजक यांनी नियोजन उत्तम प्रकारे केले होते. महिलांबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ व्यक्ती, व पुरुष मंडळी या अथर्वशीर्ष पठणात सहभागी झाले होते. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महापौर मुक्ता टिळक, अशोक गोडसे, आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
