
मुंबई : नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्यातीप्राप्त लालबागचा राजाच्या चरणी एका भाविकाने १ किलो १०१ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या मूर्ती अर्पण केल्या असून सुमारे ३१ लाख ५१ हजार रुपये ऐवढी या दोन्ही मूर्तींची किंमत आहे.
‘राजा’च्या चरणी १ किलो १०१ ग्रॅम वजनाच्या मूर्ती अर्पण
गणपती आणि लक्ष्मी अशा या दोन सोन्याच्या मूर्ती आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका भाविकाने दानपेटीत ह्या मूर्ती टाकल्या होत्या. या मूर्ती दान करणाऱ्या भाविकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. लालबागचा राजाच्या चरणी दरवर्षी भाविकांकडून कोट्यवधींची देणगी अर्पण केली जाते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून नवसरूपी आलेल्या या वस्तूंचा जाहीर लिलाव करण्यात येतो. त्यामधून जमा होणाऱ्या पैशातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.
