गणेशाच्या आकारातील मस्त पेनड्राईव्ह

pendrive
आज गणेश जयंती. भारतात देशभर घरोघरी आणि सार्वजनिक रूपाने आज गणेश पाहुणे म्हणून विराजमान होणार आहेत. गणेश ही बुद्धीची आणि विघ्नहरण करणारी देवता असल्याने गणेश मूर्ती भेट म्हणूनही दिली जाते. फोटो, लॉकेट, अंगठ्या, पेंडंट, मूर्ती, पेंटींग अशा अनेक स्वरूपात या भेटी दिल्या जातात. आता गॅझेट स्वरूपातही गणेश भेट देणे शक्य झाले आहे. गणेशाच्या आकाराचे पेनड्राईव्ह ऑनलाईनवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे मस्त आकारातले हे पेनड्राईव्ह आकर्षक आहेतच पण सहज परवडणार्‍ या किंमतीतही आहेत.

एंटर यूएसबी १६ जीबी फ्लॅश ड्राईव्ह फ्लिपकार्टवर उपलब्ध असून त्याची किंमत आहे ७३५ रूपये. गणेश/ गणपती यूएसबी पेन ड्राईव्ह ८ जीबीचा असून तो अॅमेझॉन वर उपलब्ध आहे. त्याची किंमत आहे ७९९ रूपये. मोसार्बिअर स्पेशल एडिशन ४ जीबी गणेश पेन ड्राईव्ह स्नॅपडीलवर ५१९ रूपयांत मिळतो आहे. एंटर देवदेवा ८ जीबीचा पेनड्राईव्ह फ्लिपकार्टवरच ५६० रूपयात उपलब्ध आहे. तर एचपीचा ३२ जीबीचा पेन ड्राईव्ह होमशॉप १८ वर उपलब्ध असून त्याची किंमत आहे ११२५ रूपये.

मग आता वाट कशाची पाहताय? अगदी भेट म्हणून द्यायचे नसेल तर स्वतःसाठीही ही खरेदी होऊ शकते. म्हणजे गणेशजी सतत तुमच्याजवळ या रूपाने राहू शकतील.

Leave a Comment