कांगडा व्हॅली- कंप्लीट टूरिस्ट डेस्टीनेशन


आजकाल विविध प्रकारचे पर्यटन करण्याकडे लोकांचा कल वाढता आहे. म्हणजे साहसी, धार्मिक, मेडिकल, लझ्जरी पर्यटन अशा विविध कारणांनी लोक भटकत असतात.हिमाचलमधील कांगडा व्हॅली हे असे कंप्लिट टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. मनोरंजन, साहस, शांतता, धार्मिक, ऐतिहासिक अशा बाबींची आवड असणार्‍या पर्यटकांसाठी भटकायला ही उत्तम जागा आहे.इतकेच नव्हे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी येथे कांही ना कांही आहेच.


ज्यांना रोमांच व साहसाची आवड आहे त्यांच्यासाठी येथे जगातील दोन नंबरचे मोठे पॅराग्लायडिंग टेक ऑफ सेंटर आहे. कांगडा बेस्ट धार्मिक स्पॉटही आहे. येथे माता ब्रजेश्वरी, माता ज्वालाजी, चामुंडा अशी काही खास मंदिरे आहेत जेथे भाविकांची गर्दी असते. कांही मंदिरे आठ महिने पाण्यात बुडालेली असतात व चार महिने जमिनीवर असतात. येथे ऐतिहासिक महत्त्वाच्या ही अनेक वास्तू आहेत. त्यात नुरपूर किल्ला, वैजनाथ मंदिर, मससर मंदिर, मॅक्लोनेडगंज चर्च यांचा समावेश करता येतो. या व्हॅलीचे मुख्यालय धर्मशाला असून येथे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहे तसेच कांगडा वस्तूसंग्रहालय, भागसूताल धबधबा ही प्रमख पर्यटनस्थलेही आहेत.

Leave a Comment