‘लालबागचा राजा’च्या देणगीची मोजदाद धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निगराणीत


मुंबई : यावर्षीपासून गणेशोत्सव काळात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे जमा होणाऱ्या देणगीची मोजदाद धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत केली जाणार असून यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आर एच कुंभार, एस थोरगव्हाणकर, गोपु नटराजन या तिघांचा समावेश आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला यासंदर्भातील आदेश १६ ऑगस्ट रोजी दिले गेले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर दानपेट्यांमधील रक्कम आणि दागिन्यांच्या लिलावावेळी गैरकारभार होत असल्याने या गोष्टी पारदर्शक व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा करत होते.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नेमणूक केलेल्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली गणेशोत्सव काळातील दानपेट्या या उघडून त्यातील रकमेची मोजदाद करावी आणि ती रक्कम ट्रस्टच्या खात्यात ताबडतोब जमा करावी. गणेशोत्सव काळातील सुवर्णालंकार आणि इतर वस्तूंचा लिलावही निरीक्षकांच्या देखरेखीखाली करून तात्काळ ही रक्कम टृस्ट खात्यात जमा करावी. गणेशोत्सव काळातील जमा खर्चाचा वेगळा तपशील १० दिवसांच्या आत मंडळाने धर्मादाय आयुक्त कार्यालयास सादर करावा.

Leave a Comment