गोमूत्रातून होऊ शकणार महिना ५ हजारांची कमाई


गोमूत्र व गोमय यांची उपयुक्तता यावर केंद्र सरकारने स्वतंत्र विभाग स्थापून संशोधन सुरू केले असतानाच केंद्र सरकारच्या लघुउद्येाग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी सरकारला गोमूत्रातून शेतकर्‍यांना महिना पाच हजारांची कमाई होऊ शकेल असे पत्र लिहिले आहे. सिंग यांच्या पत्रानुसार ड्राय डेअरी, जैविक शेतीला ही कमाई पुरक ठरू शकेल व शेतकरी यातून वर्षाला ५० ते ६० हजारांचे उत्पन्न मिळवू शकतील.

हे पत्र लिहिताना सिंग यांनी वैज्ञानिक आधार घेतला आहे. त्यानुसार ३० गायींचा गोठा असेल तर त्यातून गाव पंचायतीला महिना ३० ते ५० हजारांची कमाई होईल शिवाय पाच ते सहा जणांना रोजगार मिळेल. गोमूत्र अनेक रोगांत उपयुक्त ठरले असून भारतात त्याचा वापर प्राचीन काळापासून होत आहे. तसेच घराची साफसफाई करण्यासाठी गोमयचा वापरही अधिक योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच गोमूत्र उसांसारख्या पिकांवर फवारल्यास रोगांचा प्रादुर्भाव होत नाही हेही अनेक ठिकाणी केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे..गोमूत्र, गोमयापासून बनविलेली खते वापरल्यास शेती उत्पादन २० ते २५ टक्के अधिक होत असल्याचेही दिसून आले आहे.

Leave a Comment