
नवी दिल्ली – आता ईपीएफचा लाभ बंद असलेल्या खात्यांनाही मिळणार असल्यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे. नोकरदारांसाठी भविष्य निर्वाह निधी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक असल्यामुळे नोकरदार वर्गासाठी ईपीएफओचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ईपीएफचा लाभ आता बंद असलेल्या खात्यांनाही मिळणार
ईपीएफचा लाभ केवळ यापूर्वी चालू खात्यांना मिळत होता. पण आता बंद खात्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे. नोकरदारांनी ईपीएफमध्ये गुंतवणूक करावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ईपीएफओचे आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी दिली.
