बीफला मागे टाकत बासमती निर्यातीत एक नंबरवर


भारतातून निर्यात होणार्‍या टॉप कमोडिटी मध्ये यंदा बास्मतीने पुन्हा १ नंबरवर झेप घेतली असून गतवर्षी बीफची निर्यात बास्मतीपेक्षा अधिक झाली होती. देशातून जून १४-१५ पर्यंत बीफने बास्मतीला मागे टाकत टॉप कमोडिटी एक्पोर्टचा दर्जा मिळविला होता कारण या काळात भारतातून बास्मती सर्वात मोठ्या प्रमाणावर आयात करणार्‍या इराणकडून नवीन ऑर्डर आल्या नव्हत्या.भारताच्या बास्मती निर्यातीतला एक चतुर्थांश हा इराणमध्ये निर्यात होत असतो. यावर्षी इराणने त्यांच्याकडेही बास्मतीचे पिक चांगले असतानाही भारतातून आयातीसाठी मोठ्या ऑर्डर दिल्या आहेत.

याच दरम्यान भारतातील सरकारने मंडीतील जनावरांच्या विक्रीवर बंदी घातल्याने त्याचा परिणाम बीफच्या निर्यातीवर झाला परिणामी ही निर्यात रोडावली.मात्र या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निर्यातीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी आयातदार भारतातील अनिश्चित परिस्थितीमुळे मोठ्या ऑर्डर देण्यास धजत नसल्याचे सांगितले जात आहे. अपेडा कडून मिळालेल्या आकडेवारीनुसर भारतातून यंदा १.२६ अब्ज डॉलर्स म्हणजे ८१६८ कोटी रूपयांचा बास्मती एप्रिल ते जून या काळात निर्यात झाला असून गतवषी याच काळात निर्यात ६१९६ कोटींची झाली होती. बीपची निर्यात याच काळात ५४३३ कोटींची होती.

Leave a Comment