आता एअरटेल देणार २५०० रूपयात स्मार्टफोन !


मुंबई – पुन्हा एकदा रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेल तयार झाली असून एअरटेल जिओला टक्कर देण्यासाठी स्वस्त ४जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जिओच्या १५०० रूपयांच्या फिचर फोनला टक्कर देण्यासाठी एअटरटेल या फोनची किंमत २५०० रूपये ठेवण्याची शक्यता आहे.

यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कंपनी हा फोन ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील किंवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बाजारात आणू शकते. यासाठी एअरटेलची फोन बनवणा-या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. जिओप्रमाणे या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस कॉल फ्री मिळण्याचीही शक्यता आहे. हा फोन अॅंन्ड्रॉइड सिस्टिमवरच आधारित असेल तसेच यामध्ये गुगल प्ले-स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्याचे फिचरही मिळेल. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, फोन बनवणा-या कंपन्यांसोबत एअरटेलची चर्चा सुरू आहे. फोनमध्ये मोठी स्क्रीन, चांगला कॅमेरा आणि उत्तम बॅटरी बॅकअप असेल.

Leave a Comment