राजीनाम्यास कारण की…


नवी दिल्ली – खुले पत्र आणि ब्लॉगच्या माध्यमातून इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) विशाल सिक्का यांनी राजीनाम्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून अशी परिस्थिती तयार झाली होती की, मी सीईओ म्हणून काम करु शकत नव्हतो. अनेक आरोपांचा सिक्का हे सामना करत होते. इन्फोसिसमध्ये ऑगस्ट २०१४मध्ये त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. सिक्का यांच्यावर आरोप होता की ते योग्य पद्धतीने कॉर्पोरेट गव्हर्नंन्स हताळत नव्हते. बड्या पॅकेजमुळेही सिक्का निशाण्यावर होते.

आपल्या ब्लॉगमध्ये सिक्का यांनी लिहिले आहे, गेल्या काही महिन्यांपासून या निर्णयाचा मी विचार करत होतो. याबद्दलच्या बऱ्या-वाईट सर्व फायद्या तोट्यांचा मी विचार केला. आरोपांवर विचार केला आणि त्यावरील स्पष्टीकरणाचाही विचार केला. खूप विचार केल्यानंतर आणि गेल्या काही तिमाहींचा विचार केल्यानंतर या निर्णयावर ठाम राहाण्याचे निश्चित केले.

Leave a Comment