रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन


मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने नवा प्लॅन लाँच केला असून एअरटेलने ४जी यूजर्ससाठी ३९९ रुपयात ८४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग असा नवा प्लॅन आणला आहे.

८४ दिवसांसाठी या नव्या प्लॅनची वैधता असणार आहे. एअरटेलने हा नवा प्लॅन रिलायन्स जिओच्या ‘धन धना धन’ ऑफरला टक्कर देण्यासाठी लाँच केला आहे. याआधी मागील महिन्यात जिओने ‘धन धना धन’ ऑफरमध्ये बदल करत ३९९ रुपयात ८४ जीबी डेटा असा नवा प्लॅन आणला होता. दरम्यान, याआधी एअरटेलने २९३ रुपये आणि ४९९ रुपये असे दोन नवे प्लॅनही लाँच केले होते.

(विशेष सूचना – तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची खात्री कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा)

Leave a Comment