गृहकर्जाबाबतीच्या स्पर्धेत अॅक्सिस बँकेने गाठले टोक


मुंबई: बँकिंग क्षेत्रातही सध्या मोबाईल कंपन्यांप्रमाणे मोठी स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येत असून त्यात आता गृहकर्जाबाबतीच्या या स्पर्धेने टोक गाठले आहे.

गृहकर्जदारांना तब्बल १२ मासिक हप्ते माफ करण्याची घोषणा खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अॅक्सिस बँकेने केली आहे. पण त्यासाठी तुमचे गृहकर्ज ३० लाखांवर असायला हवे, त्याचबरोबर त्याचा एकही हप्ता तुमच्याकडून थकायला नको, अशी त्यासाठी अट ठेवण्यात आली आहे. मात्र सलग वर्षभराचे हप्ते माफ होणार नाहीत, तर कर्जदाराने नियमित कर्ज भरले, तर त्याला चौथ्या, आठव्या आणि बाराव्या वर्षी असे चार-चार महिने सूट दिली जाईल. घर खरेदी, दुरुस्ती, बांधकाम किंवा जमीन घेऊन बांधकामासाठीच हे कर्ज वापरता येऊ शकते. ८.३५ % एवढा या गृहकर्जाचा व्याजदर असेल. तुमचे दुसऱ्या बँकेत जर गृहकर्ज असेल, तर ते अॅक्सिस बँकेत वर्ग करण्याची ऑफरही देण्यात आली आहे.

Leave a Comment