रस्त्यावरुन संसदेत पोहोण्यासाठी तुम्हाला मिळणार खास शिक्षण


पूर्वीच्या काळी राजकारणात येण्यासाठी मात्तब्बर लोकांना खूप मोठा संघर्ष करावा लागत होता. कोणताही विशेष अभ्यासक्रम राजकारणात करिअर करण्यासाठी नव्हता. पण जर तुम्हाला आता नेता बनायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचे शिक्षण मिळू शकते. यासाठी मुंबईतील एका संस्थेने राजकारणात भविष्य बनवण्यासाठी नवा कोर्स सुरु केला आहे. हा कोर्स ९ महिन्यांचा असणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी नेते बनण्याचा हा कोर्स संबंधित असून हा कोर्स मुंबईमध्ये सुरु झाला आहे. या कोर्सचे नाव पोस्ट ग्रॅज्युएशन इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गवर्नेंस असे असून या कोर्ससाठी सुरुवातीलाच ३२ जणांनी प्रवेश घेतला आहे. एमबीए ते आयआयटीचे विद्यार्थी यामध्ये आहे. यासाठी अडीच लाख रुपये फी असणार आहे. महाराष्ट्र शिवाय उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगना, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेशमधील तरुणांनी येथे प्रवेश घेतला आहे. या कोर्ससाठी मुंबईतील मीरा-भाईंदरच्या भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पत्नी सुमन मेहता यांनी देखील प्रवेश घेतला आहे. यामध्ये सध्या त्या एकट्याच महिला आहेत.

Leave a Comment