ड्युअल रिअर कॅमेरावाला असुसचा ‘झेनफोन झूम एस’ भारतात लाँच


मुंबई : ‘झेनफोन झूम एस’ हा स्मार्टफोन असुसने गुरुवारी लाँच केला असून या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आणि ५०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. २६ हजार ९९९ रुपये एवढी भारतात या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे.

हा फोन जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने लाँच करण्यात आला आहे. या फोनचा कॅमेरा हे खास आकर्षण असणार आहे. हायटेक फीचर्ससह १२ मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सध्या हा फोन अँड्रॉईड ६.०.१ मार्शमेलो सिस्टम सपोर्टेड आहे. पण लवकरच अँड्रॉईड नॉगट ७.० अपडेट मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Leave a Comment