तुम्ही ७५० रुपयात किती पाणीपुरी खाल…


आम्ही तुम्हाला असे का विचारले हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. कारण पण त्याला तसेच आहे. श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यत ‘पाणीपुरी’ कोणाला आवडत नाही. आंबट, गोड पाण्याने भरलेली ही पाणीपुरी फारफार तर वीस-पंचवीस रुपयांना मिळते. त्यामुळे आपल्या जिभेचे चोचले तर पुरवले जातातच आणि तात्पुरता पोटही भरते. पण आम्ही आज तुम्हाला अशा पाणीपुरीबद्दल सांगणार आहोत जिची किंमत ऐकली तर तुम्हाला शॉक बसल्याशिवाय राहणार नाही. नुकताच दिल्लीतील एका तरूणाने युट्युबवर पाणीपुरीचा एका व्हिडिओ अपलोड केला असून या पाणीपुरीची किंमत ज्यात ७५० रुपये असल्याचे त्याने म्हटले आहे.

आतातर तुम्हाला शॉक नक्कीच बसला असेल आणि तुम्ही मनात म्हणत असला, राव! ७५० रुपयांत मी किमान ३५ प्लेट तरी पाणीपुरी खाईन. पण आम्ही तुम्हाला जेव्हा पुढची गोष्ट सांगू तेव्हा तुम्हाला आणखी एक धक्का बसेल, तो म्हणजे असा की या ७५० रुपयांत ३५ प्लेट तर सोडाच पण साध्या ३५ पाणीपुरीही खाणाऱ्याच्या वाट्याला येत नाही. ७५० रुपयांत मोजून फक्त चारच पाणीपुरी खाणाऱ्याच्या वाट्याला येतात.

हा व्हिडिओ ‘hmm!’ या युट्यूब चॅनलवरून अपलोड करण्यात आला असून हा व्हिडिओ दिल्लीमधील ‘पुलम’ हॉटेलचा आहे, एवढी महागडी पाणीपुरी तिथे मिळते. पण आता तुम्हाला या महागड्या पाणीपुरीची खासियत माहिती करून घ्याची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल.