जिओला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली एअरसेल


मुंबई: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ पदार्पणातच बाजारपेठेतील स्पर्धक कंपन्यांचा अवकाश व्यापून घेण्यात यशस्वी ठरली. जवळपास सर्वच कंपन्यांनी रिलायन्सचा वारू रोखण्यासाठी कंबर कसली आहे. म्हणूनच या कंपन्यांनी ग्राहकांवर विविध ऑफर्सची बरसात सुरू केली आहे. आयडीया, व्होडाफोन, एअरटेल आदी कंपन्यांनंतर एअरसेलनेही या स्पर्धेत उडी घेतली असून, एअरसेल येत्या काळात रिलायन्सला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. एअरसेलनेही ४१९ रूपयांचा प्लान लॉंच करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

एअरसेलने लॉंच केलेल्या नव्या प्लान मध्ये ४१९ रूपयांमध्ये चक्क २जीबी डेटा प्रतिदिन तसेच, अनलिमिटेड कॉलींग फ्री असणार आहे. एअरसेलची ही ऑफर ८४ दिवसांसाठी वैध असणार आहे. रिलायन्स जिओच्या धन धना धन प्लानचीही वैधता ८४ दिवसच आहे. पण रिलायन्स जिओ धन धना धन ऑफरमध्ये दिवसाला केवळ १जीबी डेटा देते. एअरसेलच्या प्रिपेड प्लानची किंमत नॉर्थ ईस्ट मध्ये ४१९ रूपये तर, जम्मू-काश्मीरमध्ये ४४९ रूपये आहे. याशिवाय कंपनीने जम्मू काश्मीर सर्कलमध्ये एक २९९ रूपयांचा प्लानही लॉंच केला आहे.

Leave a Comment