फ्लिपकार्टची जिओच्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर


रिलायंस जिओने टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर एकामागून एक असे धमाके करत आहे. पण आता जिओ रिचार्ज आणखी स्वस्त झाले असून तुम्ही जिओच्या रिचार्जवर ७६ रुपये परत मिळवू शकता. जिओ प्रिपेड रिचार्जवर फ्लिपकार्टच्या मोबाईल वॉलेटमधून ७६ रुपये कॅशबॅक दिले जाणार आहे. जिओच्या समर सरप्राइज आणि धन धना धन ऑफरचा सर्वाधिक वापर केला जाता आहे. कस्टमरला जिओच्या नव्या धन धना धन ऑफरमध्ये ३९९ रुपयांचा रिचार्ज करावा लागतो ज्यामध्ये ८४ दिवस राज १ जीबी डेटा मिळतो.

फ्लिपकार्टची ही ऑफर १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत असणार आहे. यामध्ये ७६ रुपयांचे कॅशबॅक दिले जाणार आहे. यासाठी कमीत कमी ३०० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. ही ऑफर जिओ प्रिपेड कस्टमर्ससाठी आहे. जे पहिल्या रिचार्जवर मिळेल. ही ऑफर iOS और Android डिवाइसवर उपलब्ध आहे.

Leave a Comment