आयआरसीटीसीच्या ‘बुक नाऊ पे लेटर’ सुविधेला सुरूवात


नवी दिल्ली – रेल्वे प्रवाशांना आता अवघ्या काही सेकंदातच रेल्वे तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वेने हे पाऊल ‘डिजिटल पेमेंट’ला प्रोत्साहन देण्यासाठी उचलले असून तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया आयआरसीटीसीने आणखी सोपी आणि सुटसुटीत केली आहे. आयआरसीटीसीने ई-पेलेटरच्या सहकार्याने ‘बुक नाऊ पे लेटर’ चेकआऊट ही सुविधा सुरू केली असल्याची माहिती रेल्वे राज्य मंत्र्यांनी संसदेत दिली आहे.

रेल्वे प्रवाशांना ई-पेलेटरद्वारे एका क्लिकवर आणि ओटीपीच्या मदतीने काही सेकंदातच तिकीट आरक्षित करता येणार आहे. याआधीच्या क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग आदी पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत ही तिकीट आरक्षित करण्याची सुविधा अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे. रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना यापूर्वी पॅन किंवा आधार कार्ड क्रमांकासह सर्व माहिती भरावी लागत होती. त्यासाठी वारवार साईन-अप करावे लागत होते. पण आता रेल्वेने सुरु केलेल्या या नवीन सुविधेमुळे तिकीट आरक्षित करण्यासाठी आता वारंवार साईन-अप करण्याची गरज भासणार नाही, असे रेल्वे राज्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment