नवी दिल्ली: अँड्रॉईड प्लॅटफॉर्ममधून सगळ्यात जास्त प्रमाणात डाउनलोड होणारे दुसरे अॅप म्हणून दुरसंचार कंपनी रिलायन्स जिओचे मोबाईल अॅप ठरले आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत १० करोड लोकांनी माय जिओ अॅप डाउनलोड केला असून माय जिओ हे अॅप कमी वेळात ऐवढी प्रसिद्ध मिळवणारे पहिले भारतीय अॅप आहे.
सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या अॅपच्या यादीत पोहचले माय जिओ
रिलायन्स जिओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, गुगल प्लेवर माय जिओ १० करोड पेक्षा अधिक वेळा डाउनलोड झाले आहे. तसेच सेल्फकेअर अॅप काढणारी ही पहिली कंपनी आहे. १० करोडचा आकडा पार केल्याने माय जिओ अॅपने हॉटस्टारला देखील मागे टाकले आहे. एका वर्षात १० करोड डाउनलोड मिळवणारे माय जिओ हे पहिले भारतीय अॅप आहे. एअरटेल, वोडाफोन इंडिया व आयडिया सेल्युलर यांचे सेल्फकेअर अॅपचे गूगल प्ले स्टोरवर १ करोड डाउनलोड्स आहेत. रिलायन्स जिओच्या जिओ टीव्हीचे पाच करोड डाउनलोड्स आहेत. तर एअरटेलच्या टीव्ही अॅपला ५० लाख डाउनलोडस मिळाले आहेत.