नोकरी बदली केल्यास नका करू पीएफ खात्याची चिंता


नवी दिल्ली : तुम्हाला नोकरी बदली केल्यास आता पीएफ खात्याची चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे. कारण केंद्र सरकारने नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान सर्वांनाच नोकरी बदली केल्यावर प्रश्न पडतो की आपल्या पीएफ खात्याचे काय करायचे ? भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी तसेच नव्या कंपनीत नवे खाते उघडण्याचा त्रास सर्वांनाच होतो. पण आता तसे काहीही करण्याची गरज नाही. कारण, आता नोकरी बदलताच आपोआप तुमचे पीएफ खातेही ट्रान्सफर होणार आहे.

याबाबत मुख्य भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचा-यांसाठी पीएफची प्रक्रिया अधिक सरळ आणि सोपी व्हावी यासाठी आम्ही बदल करत आहोत. सप्टेंबर महिन्यापासून, समजा तुम्ही नोकरी बदलली तर तुमचे पीएफ खाते बंद होणार नाही.

अनेक पीएफ खाती नोकरी बदलली की बंद होतात. पण आता तसे होणार नाही. प्रत्येक कर्मचा-याला आता नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे आता जुने पीएफ खाते बंद होणार नाही. म्हणजेच तुम्ही जर नोकरी सोडली आणि दुस-या कंपनीत गेलात तर तुमचे पीएफ खातेही आता ट्रान्सफर होणार आहे. विशेष म्हणजे, अर्जाशिवायच त्याचे पीएफ खात्यातील पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील.

आता नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे केल्याने हे पीएफ खाते बंद होणार नाही. तसेच पीएफ खात्यातील पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील. जर कर्मचा-याकडे आधार आयडी आणि वेरिफाइड आयडी असेल तर तो देशभरात कुठेही नोकरीसाठी गेला तरी त्याचे पीएफ खातं ट्रान्सफर होईल अशी माहिती मुख्य भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी दिली आहे.

Leave a Comment