फ्लिपकार्टचा ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्टदरम्यान ‘द बिग फ्रीडम सेल’


मुंबई : फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी आपल्या ‘द बिग फ्रीडम सेल’ची घोषणा केली असून हा सेल ९ऑगस्ट ते ११ ऑगस्टपर्यंत असणार आहे. मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, हेडफोन, कॅमेरा आणि अक्सेसरीजवर या सेलमध्ये घसघशीत सूट मिळणार आहे. तसेच या सेलमध्ये एचडीएफसीच्या क्रेडिट कार्ड यूजर्संना अतिरिक्त सूटही मिळणार आहे.

या सेलमध्ये तब्बल ७२ तास शाओमीच्या रेडमी नोट ४ची विक्री सुरु असणार आहे. पण फ्लिपकार्टने अद्याप तरी कोणकोणत्या ऑफर असणार आहेत हे स्पष्ट केलेले नाही. पण काही ऑफर्सबाबत मात्र माहिती दिलेली आहे. या सेलमध्ये मोटो एम आणि मोटो जी५ प्लस हे फोन १२,९९९ रुपये आणि १४,९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. याप्रमाणेच इतरही स्मार्टफोनवर बरीच सूट असणार आहे. त्याचबरोबर गुगल पिक्सल हा ६७,००० किंमतीचा स्मार्टफोन ४८,९९९ रुपयांना मिळणार आहे. या सेलमध्ये आणखी किती ऑफर असणार हे उद्याच समजणार आहे.

Leave a Comment