आयफोन ८सोबतच लाँच होऊ शकतो आयफोन ७एस


मुंबई : अॅपलच्या आयफोन ७ चे नवीन अपडेटेड व्हर्जन आयफोन ७ एस आगामी आयफोन ८ सोबत लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या इंटरनेटवर आयफोन ७ एसच्या डमी मॉडेलचे फोटो लीक झाले आहेत.

याबाबतचे वृत्त ‘द व्हर्ज’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आगामी आयफोन ७ एसमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात येणार आहे. सध्या बाजारात आयफोन ८ ची जोरदार चर्चा सुरु असून त्यातच आयफोन ७ एस विषयी अनेक वृत्त समोर आले आहेत. पुढील महिन्यात अॅपल तीन फोन लाँच करण्याची शक्यता आहे.

आयफोन ८ च्या स्क्रीनचा आकार ५.८ इंच असेल. तर बॉडी आयफोन ७ एवढीच असेल. पण आयफोन ७ मध्ये ४.७ इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली होती. दरम्यान आयफोन ८ मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल का, याबाबतचा सस्पेंस अजून कायम आहे.

Leave a Comment