मोदींची राखी-बहीण पाकिस्तानी उमर कमर शेख


मूळ पाकिस्तानी वंशाच्या उमर कमर शेख गेली २२ वर्षे नरेंद्र मोदी यांच्या राखीबहीण असून त्या दरवर्षी मोदींना राखी बंाधतात. टिव्ही वाहिन्यांना उमर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाही मोदींकडून त्यांना दिल्लीला राखी बांधण्यासाठी येण्याचा फोन आला व त्यांनी रविवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन राखी बांधली. उमर शेख यांच्याप्रमाणेच अनेक शालेय विद्यार्थींनी तसेच वृंदावनमधील गोपीनाथ मंदिरातील ५०० विधवांनीही दिल्लीत जाऊन मोदी यांना राखी बांधली.

उमर शेख सांगतात, त्यांचा विवाह १९८१ साली मोहसीन यांच्याबरोबर झाला. त्यावेळी मोदी संघाचे प्रचारक होते. मोहसीन यांचे कुटुंब अहमदाबाद मध्ये आहे मात्र उमर व मोदी यांची पहिली भेट दिल्लीतच मोहसीन यांच्या चित्रप्रदर्शनावेळी झाली. त्यावेळी मोदींनी कैसे हो बेहन अशी विचारणा केली व तेव्हापासून मोदी यांचे भाऊ बनले. हे नाते आजही कायम आहे. या राखी निमित्त उमर यांनी मोदींनी दीर्घायुष्य लाभो आणि जगात त्यांनी सुरू केलेले भारत मिशन यशस्वी होवो अशी दुवा मागितली आहे.

Leave a Comment