एअरटेल देणार ३९९ रुपयात ८४ जीबी डेटा


मुंबई : रिलायन्स जिओला देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने जोरदार टक्कर दिली असून ३९९ रुपयांचा नवा प्लॅन एअरटेलने आणला आहे, प्रीपेड ग्राहकांना ज्यामध्ये दररोज १जीबी डेटा ८४ दिवसांसाठी मिळणार आहे. या डेटासोबत ग्राहकांना अनलिमिटेड एसटीडी-लोकल व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे. ही ऑफर रिलायन्स जिओच्या ३९९ रुपयांच्या धन धना धन ऑफरप्रमाणेच आहे.

याबाबतची माहिती एअरटेलने आपल्या वेबसाईटवर दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ऑफर केवळ ४जी ग्राहकांसाठी आहे. म्हणजे तुमच्याकडे ४जी मोबाईल असेल, तरच तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल. हा एक स्पेशल प्लॅन असून इतर कोणत्याही प्लॅनसोबत घेतला जाऊ शकत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment