भीम अॅपवर १५ ऑगस्टपासून आणखी कॅशबॅक मिळण्याची शक्यता


नवी दिल्ली : तुम्हीही भीम अॅपचा वापर डिजिटल पेमेंटसाठी करत असाल तर मोठी कॅशबॅक ऑफर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिळण्याची शक्यता असून या स्वातंत्र्य दिनापासून कॅशबॅक वाढवण्याचा प्रस्ताव लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. सरकारने नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी हे अॅप आणले होते. प्रस्ताव या स्वातंत्र्य दिनापासून भीम अॅपच्या ग्राहकांसाठी कॅशबॅकचा लागू होऊ शकतो. सरकारकडे अधिकाधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी कॅशबॅक वाढवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव या १५ ऑगस्टपर्यंत मंजूर होण्याची अपेक्षा एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एपी होटा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले आहे.

इतर डिजिटल पेमेंट अपकडून भीम अॅपच्या तुलनेत त्यांच्या ग्राहकांना जास्त कॅशबॅक दिला जातो. सध्या तुम्ही कोणाला भीम अॅप रेफर केल्यास तुम्हाला २५ रुपये मिळतात. नोटाबंदीनंतर सुरु करण्यात आलेल्या या अॅपचे सध्या १ कोटी ६० लाख ग्राहक आहेत. यापैकी ४० लाख ग्राहक सक्रिय आहेत.

Leave a Comment