आयफोनवर पेटीएमकडून भरघोस डिस्काउंट


नवी दिल्ली : पेटीएमवर अॅपलच्या आयफोन SE वर कॅशबॅकसह बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. तसेच पेटीएमवर अॅपलचा आयफोन SE च्या ३२जीबीवर १२ टक्के सूट देण्यात आली आहे. सूट मिळल्यानंतर या फोनला तुम्ही २२ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकतात. तसेच या मॉडेलवर ३ हजार रुपयांचा कॅशबॅक देण्यात आला आहे. शिपमेंट २४ तासमध्ये पेटीएम वॉलेटमध्ये ३००० हजार कॅशबॅक देण्यात आला आहे.

तुम्हाला ही कॅशबॅक ऑफर एका प्रोमो कोडद्वारे दिली जाणार असून हा कोड ऑनलाइन खरेदी करताना टाकावा लागणार आहे. कोड पेमेंट ऑप्शनसह येतो. प्रोसिड टू पेपासून पुढे जाण्यासाठी प्रथम ‘Apply Promo’वर क्लिक करा. तुम्ही असे केले नाही तर ३ हजार रुपये कॅशबॅक मिळणार नाही. कॅशबॅक ही ऑनलाइन पेमेंट केल्यावर दिली जाणार आहे. या शिवाय बायबॅक ऑफरही देण्यात आला आहे. ९ हजार रुपयात या फोनला तुम्ही काही दिवसांनंतर दुसऱ्या स्मार्टफोनशी एक्सचेंज करू शकतात. फोनला सहा महिन्यानंतर आणि ११ महिन्यांपूर्वी एक्सचेंज करण्याची ऑफर आहे. तसेच ५ हजार रुपयांचे कॅशबॅक व्हाऊचरही देण्यात येणार आहे. या व्हाऊचरचा वापर फ्लाइट बुकिंग, मोबाईल एक्सेसरीज खरेदी करू शकतात.

Leave a Comment