९६ वर्षांत पहिल्यांदाच १२ ऑगस्ट रोजी होणार नाही रात्र


नवी दिल्ली : सध्या एक मेसेज सोशल मीडियात प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये असे काही म्हटले आहे ज्याच्यावर तुमच्या आमच्या पैकी कुणाचाही विश्वास बसणार नाही. १२ ऑगस्ट २०१७ रोजी रात्र होणार नाही, म्हणजेच रात्रीच्या वेळीही दिवसाप्रमाणेच प्रकाश असणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. हा चमत्कार इतिहासात प्रथमच होणार असल्याचा दावा नासानेही केला आहे.

व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, ९६ वर्षांत पहिल्यांदाच १२ ऑगस्ट रोजी रात्र होणार नाही. म्हणजेच दिवसातील २४ तासही प्रकाशच राहणार आहे. आकाशात उल्कापात होणार असल्याने प्रकाश निर्माण होणार आहे. त्यामुळे हे न पाहणा-याला मोठे नुकसान होऊ शकते. पण १२ ऑगस्ट रोजी रात्री आकाशात उल्कापात होणार असल्यामुळे रात्रीही काहीप्रमाणात प्रकाश निर्माण होणार आहे. रात्रीही दिवसाप्रमाणे प्रकाश असणार असे काहीही नसल्याचे नासानेही म्हटले आहे.

नासाच्या साईटवर दिलेल्या रिपोर्टनुसार, १२ ऑगस्ट रोजी उल्कापात होणार आहे. त्यामुळे रात्री थोडा उजेड निर्माण होईल. प्रत्येकवर्षी तीन मोठे उल्कापात होतात. यापैकी पहिला उल्कापात हा जानेवारी महिन्यात, दुसरा उल्कापात ऑगस्ट महिन्यात तर तिसरा डिसेंबर महिन्यात पहायला मिळतो.