टाटा टेलिकॉम उद्योग विकत घेणार मुकेश अंबानी?


मुंबई : आयडीया आणि व्होडाफोनच्या हातमिळवणीनंतर टेलिकॉम क्षेत्रात आता आणखी एक मोठे डील होण्याची शक्यता असून उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी टाटांचा तोट्यातील टेलिकॉम उद्योग विकत घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे.

आयडीया व्होड़ाफोन नंतर आता टेलिकॉम श्रेत्रात आणखी एक मोठा सौदा होऊ घातला आहे. तोट्यामध्ये चाललेला टाटा समहूचा टेलिकॉम उद्योग विकण्यासाठी रिलायन्स समूहाचे प्रयत्न सुरु आहेत आणि हा उद्योग विकत घेण्यासाठी रिलायन्स जिओशी चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे.

टाटांचा टेलिकॉम उद्योग येत्या काही दिवसात अंबानींनी विकत घेतला तर आश्चर्य वाटायला नको. उद्योग क्षेत्रातील टाटा आणि अंबानी यांची स्पर्धा जगात प्रसिद्ध आहे. टेलिकॉम क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा मैत्रीच्या संबंधात बदलते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment