कंबरदुखीवर गुणकारी स्मार्ट अंडरवेअर


पाठदुखी, कंबरदुखीने हैराण असलेल्या समस्त प्रजेसाठी अमेरिकेच्या वँडगबिल्ट विद्यापीठातील इंजिनिअर्सनी स्मार्ट मेकॅनिकल अंडरवेअर विकसित केली आहे. ही अंडरवेअर वापरल्याने कमरेखालच्या मांसपेशी ताणल्या जाऊन वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी बायोमेकॅनिकल व वेअरेबल तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. या तंत्रामुळे स्मार्ट इलेक्ट्रॅनिक्स यंत्रे शरीरावर सहज घालता येतात.

यामध्ये कपड्याच्या दोन भागांचा वापर केला गेला आहे.ते छाती व पायांवर येथील अशा पद्धतीने ही अंडरवेअर तयार केली गेली आहे. नायलॉन, लायका, पॉलिस्टर अथवा अन्य कापडांपासून ते बनविता येते. हे दोन भाग कमरेच्या मध्ये घट्ट पट्टांनी जोडले गेले असून कमरेखाली नैसर्गिक रबराचे तुकडे बसविले गेले आहेत. वेदना होत असताना हा कपडा कधीही घालता येतो. याचा मुख्य उद्देश कंबरदुखीवर उपचार हा नाही तर कमरेच्या खालच्या भागातील मसल ताणणे व त्या भागातील जाडी कमी करणे हा आहे. ताण व जाडी कमी झाल्याने वेदना दूर होते असे संशोधकांचे म्हणणे आहे. ही अंडरवेअर अॅपने नियंत्रित करता येते तसेच ब्ल्यू टूथनेही त्यावर नियंत्रण ठेवता येते.

Leave a Comment