मोटोरोलाचे जी५एस आणि जी५एस प्लस लॉन्च


मुंबई : ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आणखी दोन स्मार्टफोन मोटोरोलाने लॉन्च केले आहेत. फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या मोटो जी ५ आणि मोटो जी५ प्लस या स्मार्टफोनचे मोटो जी५एस आणि जी५एस प्लस हे अपडेट व्हर्जन्स आहेत.

मोटो जी५एस स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले, फ्रंट पॅनलवर होम बटनवर फिंगरप्रिंट स्कॅनर, ऑक्टा कोअर CPU सोबत स्नॅपड्रॅगन ४३०, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज, एसडीकार्डच्या साहाय्याने १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येईल. याच्या बॅटरी क्षमता ३००० mAh ऐवढी आहे तर यात ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ७.१ नूगट, १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा (एलईडी फ्लॅशसहीत), ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे मोटो जी५एस प्लसमध्ये ५.५ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले, २.० GHz स्पीडच्याऑक्टा कोअर CPU सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ चिपसेट, ३००० mAh क्षमतेची बॅटरी, १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा (एलईडी फ्लॅशसहीत), ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज, लूनार ग्रे आणि फाइन गोल्ड अशा दोन रंगांत उपलब्ध करण्यात आला आहे. मोटो जी५एस जवळपास १९ हजार रुपयांना उपलब्ध होईल. तर मोटो जी५एस प्लससाठी ग्राहकांना जवळपास २३ हजार रुपये मोजावे लागतील.

Leave a Comment