
नवी दिल्ली : रक्षाबंधनचे निमित्त साधत सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएल एक जबरदस्त प्लान लॉन्च करणार आहे. या प्लानचे नाव ‘राखी पे सौगात’ असे असून ग्राहकांना यात ७४ रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि त्यासोबत १ जीबी डेटा मिळणार आहे.
रक्षाबंधननिमित्त बीएसएनएलचा जबरदस्त प्लान
हा प्लान ३ ऑगस्टला प्लान लॉन्च केला जाईल. त्यानंतर १२ दिवस प्लान खरेदी करता येणार आहे. प्लानची व्हॅलिडिटी केवळ ५ दिवसांची असेल. कुठल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा यात मिळेल. याबाबत माहिती देताना बीएसएनएलचे संचालक आर. के. मित्तल यांनी सांगितले की, बीएसएनएल सणांचे निमित्त साधत अत्यंत स्वस्त ऑफर लॉन्च करत आहे. कंपनीने अनेक कॉम्बो व्हाऊचर बाजारात आणले आहेत, ज्यांमध्ये १८ टक्के अधिक कॉलिंगसोबत १ जीबी मोफत डेटा मिळेल.
