रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर


मुंबई – रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने कपात करण्याचा निर्णय जाहीर केला असून रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची रिझर्व्ह बँकेने कपात केल्यामुळे रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आला आहे. यासोबत रिव्हर्स रेपो रेटमध्येदेखील सव्वा टक्क्याने कपात करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांमधील हा निच्चांक आहे. कर्जदारांच्या ईएमआयवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे ईएमआय कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

गृह कर्ज किंवा इतर कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्याने दिलासा मिळणार आहे. कारण रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याने बँकांकडूनही व्याज दरात कपात केली जाऊ शकते. रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याने बँकांना आरबीआयकडून घेतलेल्या कर्जावर कमी व्याज द्यावे लागेल. त्यामुळे बँकांकडे अतिरिक्त रक्कम शिल्लक राहिल. याचा वापर बँकांना कर्ज देण्यासाठी करता येईल. बँकांनी व्याज दरात घट केल्यास त्याचा मोठा लाभ ग्राहक आणि कर्जदारांना होईल.

Leave a Comment