
नवी दिल्ली: आपल्या एकापेक्षा एक स्वस्तातील ऑफरमुळे रिलायन्स जिओने इतर टेलिकॉम कंपन्यांच्या नाकी नऊ आणले असल्यामुळे जिओला टक्कर देण्यासाठी अनेक कंपन्यांनी नवनवीन प्लान्स लॉन्च केले आहेत. आता एक असाच एक धमाकेदार प्लान व्होडाफोननेही लॉन्च केला आहे. हा प्लान खासकरून विद्यार्थ्यांसाठी आहे.
व्होडाफोनने विद्यार्थ्यांसाठी आणला नवा धमाकेदार प्लान !
व्होडाफोनने विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉल आणि रोज १जीबी, ४जी/३जी डेटा देणारा प्लान आणला आहे. हा प्लान ३५२ रुपयांचा असून सध्या हा प्लान दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. व्होडाफोनने याआधी २२४ रुपयांचा प्लान आणला होता. ज्याची वॅलिडिटी ७० दिवस होती. यूजरला या प्लानमध्ये रोज १जीबी डेटा मिळतो आणि फ्री कॉलिंग सर्विस देखील मिळते.
व्होडाफोनच्या या नव्या सीमसाठी सुरुवातीला ४४५ रुपये मोजावे लागणार आहे. यानंतर ८४ दिवस विद्यार्थ्यांसाठी अनलिमिटेड वॉईस कॉल आणि रोज एक जीबी ४जी/३जी डेटा, ऑफर कुपन आणि मॅसेंजर बॅग फ्री मिळणार आहे. त्यानंतर ३५२ रुपयांमध्ये हा प्लान तुम्ही घेऊ शकता.
