३१ ऑगस्टपर्यंत पॅन कार्डला आधार कार्डशी घ्या जोडून अन्यथा….


नवी दिल्ली : देशातील नागरिकांना १ जुलै पर्यंत पॅनकार्डला आधार कार्डशी जोडण्याची संधी देण्यात आली होती. पण अनेकांनी या कालावधीतही हे काम न उरकल्यामुळे याला आता पुढची तारीख मिळाली आहे. तुम्हीही जर तुमचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले नसेल तर काळजी करु नका. कारण तुमचे आधार आणि पॅनकार्ड लिंक केल नसेल तर तुमचे पॅनकार्ड १ ऑगस्टपासून रद्द होणार नाही. यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

अनेकांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यात अडचणी आल्या होत्या. काही ठिकाणी आधार-पॅनकार्ड तांत्रिक अडचणींमुळे लिंक होत नव्हते. त्यामुळे आयकर विभागाने आधार-पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत आधार कार्डला पॅन कार्डसोबत लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते. पॅन कार्ड एकदा का जर रद्द झाले तर तुम्हाला पून्हा एकदा नव्याने तुमचे पॅन कार्ड बनवावे लागेल. तसेच तुम्ही या पॅन नंबरच्या माध्यमातून तुमचे आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) दाखल कराल तर ते मान्य केले जाणार नाही.

पॅन कार्डला जर तुम्ही आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर तुमचा पगार देखील थांबला जाऊ शकतो. तुमचे पॅन कार्ड रद्द झाल्यामुळे तुमचा पगार रोखला जाऊ शकतो. म्हणजेच पॅन कार्ड रद्द झाल्यास तुमचा पगार तुमच्या बँक खात्यात प्रोसेस होणारच नाही कारण, कंपनी टॅक्सेबल लिमिटहून अधिक पगार असल्यास टीडीएस कापते आणि पॅन कार्ड रद्द झाल्यास कंपनी तसे करु शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करणेच तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

Leave a Comment