रिलायन्स जिओ देणार ७ महिने व्हॅलिडीटीसह ३८०जीबी डाटा


मुंबई: पुन्हा एकदा टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना रिलायन्स जिओने धक्का देत नवा प्लान लॉंच केला आहे. नव्या प्लाननुसार ग्राहकांना ७ महिने व्हॅलिडीटीसह चक्क ३८० जीबी डाटाही मिळणार आहे.

पदार्पणापासूनच रिलायन्स जिओने ग्राहकांवर विविध ऑफर्सची बरसात केली आहे. जिओने नुकताच ४ जी volet फीचर फोन आणला असून, हा फोन केवळ १५०० रूपयांत मिळणार आहे. अर्थात हे पैसे ग्राहकाकडून अनामत रक्कम स्वरूपात घेतले जाणार असून, तीन वर्षांनंतर हे पैसे ग्राहकाला परत मिळणार आहेत. या ऑफरचे पूढचे पाऊल टाकत रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपला नवा धमाका केला आहे. त्यानुसार ग्राहकांना ३८० जीबी डाटा ७ महिन्यांसाठी मिळणार आहे.

दरम्यान, रिलायन्स जिओने २१० दिवसांसाठी व्हॅलिडीटी असणारी ऑफर लॉन्च केली आहे. त्यानुसार ३८० जीबी डाटा मिळणार आहे. प्राईम सदस्यांना ही योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला यासाठी ४,९९९ रुपये द्यावे लागतील. यात ग्राहक मोफत अमर्यादीत कॉलिंग, रोमिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच जिओ अॅप्सची सुविधा मिळू शकते. याच्यावर कोणतीही मर्यादा असणार नाही. रिलायन्सच्या या नव्या प्लानने टेलिकॉम वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.